सातारा जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील जीवनावश्यक वस्तुंची वगळून इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश*


** 
 *सातारा जिल्ह्यातील  शहरी भागासह ग्रामीण भागातील जीवनावश्यक वस्तुंची वगळून इतर  दुकाने बंद ठेवण्याचे आदेश* 


 सातारा दि. 22 (जिमाका): कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील (शहरी व ग्रामीण)  भागातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने म्हणजेच किराणा, भाजीपाला,फळे, दूध, औषधे दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने (कपडे, ज्वेलरी, हार्डवअेर अँड पेंटस्, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, शू मार्ट,बेकरी, स्टेशनरी, सौंदर्य प्रसाधने,  ब्युटी पार्लर, मेन्स पार्लर, ड्रायक्लिनरस्, बिल्डींग मटेरियल व इतर दुकाने चालू ठेवण्याच्या यादीत नमूद नसलेली इतर सर्व प्राकरची दुकाने) पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 
          या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा2005 मधील तरतूदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
 *_साप्ताहिक सातारा दर्शन_*